Gold-Silver Price Today: सोने स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शुक्रवारी, बाजार उघडताच सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने आणि चांदी किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदीची ग्राहकांना आज संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,७९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,९१० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९०,९३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९१,३९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.