Gold-Silver Price Today: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांचा खिसा जास्त कापला जात असून खरेदीवर जास्त किंमत मोजावी लागत आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,९६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,६३० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९२,१३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९०,७६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.