Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी सोन्यासह चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळालं आहे. सोनं खरेदी करणं महाग झालं आहे. याचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७३,३९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,९७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९४,२७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९१,९४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.