Friday, June 14, 2024

Gold- Price: ग्राहक आनंदी! सोन्याचे भाव कोसळले, १० ग्रॅमची किंमत

Gold-Silver Price Today: सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदीची ग्राहकांना आज संधी मिळणार आहे.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,०१० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८९,३५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८९,२०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles