गेल्या काही महिन्यापासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे अशात ऐन गणेशोत्सव अगदी जवळ असताना सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर मात्र घसरले आहे. जाणून घेऊ या, आज सोने चांदीचे दर कसे आहेत?
सोने चांदीचे दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६६,१९३ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७२,२३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८४९ रुपये आहे म्हणजेच चांदी ८४,८७० रुपये किलोनी विकली जात आहे.गुरुवारी सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी ७२,१९० रुपये होता आणि चांदीचा दर ८४,८९० रुपये प्रति किलो होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की आज सोने ४० रुपयांनी महागले असून चांदीच्या दरात २० रुपयांची घट झाली आहे.