दसऱ्याला अनेक जण सोने खरेदी करतात. तुम्ही सु्द्धा सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण सोने चांदीच्या दरात गुरुवारच्या तुलनेने थोडी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर ७८,००० वर गेले होते पण नवरात्रीमध्ये सोन्याचे दर ७६,००० आणि ७५,००० च्या खाली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या पूर्वी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला.
गुरुवारची आकडेवारी पाहता आज सोने ४५० रुपयांनी वाढले तर चांदीचा दर सुद्धा ५५० रुपयांनी वाढला आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,५२० रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७५,८४० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९१० रुपये आहे म्हणजेच चांदी ९०,९५० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. रविवारी चांदीचा दर ९०,४०० रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७५,३९० रुपये होता.
Gold Price Today :दसऱ्याच्या तोंडावर सोने दरात वाढ! जाणून घ्या दर
- Advertisement -