Saturday, January 25, 2025

Gold Price Today : आज सोन्याचे- चांदीचे दर जाणून घ्या दर

गेल्या आठवड्याभरात सोन्या- चांदीचे दर काही प्रमाणात स्थिर असल्याचे दिसून आले. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट सोन्याचा दर ७६ हजार ६८० रुपये होता, तोच दर आज (सोमवार) ७६ हजार ७३० रुपये झाला आहे. त्यामुळे आठवड्याभरात सोन्याचा दर फक्त ५० रुपयांनी लाढला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ७६, ८३० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९२,०९० रुपये आहे, आज ८ डिसेंबरच्या तुलनेत सोन्याचा दर स्थिर आहे, तर चांदीच्या दरात २५० रुपयांनी घट झाली आहे. पण ९ डिसेंबरला मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर काय आहेत
इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, सोमवारी, ९ डिसेंबरला सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,७३० रुपये नोंदवला होता, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,३३६ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५० रुपयांनी स्वस्त झालं आहे.दरम्यान चांदीच्या दरातही आज २५० रुपयांची घट झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ९२,०९० रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वी १ किलो चांदीचा दर जवळपास ९०,६५० रुपये होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles