सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये चढ उतार दिसून येत आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७०,६७५ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७७,१०० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९०८ रुपये आहे म्हणजेच चांदी ९०.७८० रुपये प्रति किलो आहे. आज सोने १५० रुपयांनी स्वस्त झाले आहे तर चांदी १७० रुपयांनी स्वस्त झाली आहे.एक आठवड्यापूर्वी २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर ७७,५७० रुपये होता तर चांदीचा दर ९५,०१० रुपये प्रति किलो होता.