अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताआधी सोन्याच्या भावाबाबत मोठी बातमी…

0
955

अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणं शुभ मानले जाते. दरवर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात तेजी पहायला मिळत असते. मात्र यंदा सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक बाजारत सोन्या-चांदीच्या दरात चढ -उतार पहायला मिळत असून, त्याचा फटका हा भारतीय सराफा बाजाराला देखील बसला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज नुसार सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 1.20 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील 1.26 टक्क्यांची घसरण झाली आहे. सोमवारी 24 कॅरट सोन्याच्या दर 620 रुपयांच्या घसरणीसह प्रति तोळा 51,134 रुपयांवर पोहोचला तर चांदीचा दर 802 रुपयांच्या घसरणीसह 62,754 रुपयांवर पोहोचला आहे.