Google Pixel 8 Pro नं बिनदिक्कत पास केली बेंड टेस्ट
गुगल पिक्सल ८ प्रो मध्ये ६.७ इंचाचा एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो २००० निट्झच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. ह्या डिस्प्लेवर इतर फ्लॅगशिप अँड्रॉइड स्मार्टफोन प्रमाणे गोरिल्ला ग्लास विक्टस २ ची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे इतर डिवाइस प्रमाणे पिक्सलनं स्क्रॅच टेस्टमध्ये कामगिरी केली.
ह्या फोनमध्ये आयफोन १५ प्रो सीरिज प्रमाणे मजबूत टायटेनियम फ्रेम देण्यात आलेली नाही, ह्यात मेटल फ्रेम मिळते जी डिसेंट ड्युरेबिलिटी देते. जॅकच्या टेस्टमध्ये आयफोन १५ प्रो मॅक्सची बेंड टेस्ट करताना फोनवर दबाव टाकताच बॅक ग्लास फुटली. परंतु गुगल पिक्सल ८ प्रोमध्ये मात्र असं काहीही झालं नाही. फोन टेस्टमध्ये थोडा आवाज करत होता पण ह्या व्यतिरिक्त फोनल काही झालं नाही.