Sunday, July 21, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणखी वाढणार…8 वा वेतन आयोगाची स्थापना करण्याची मागणी

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांचा पगार आता पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. कारण आता आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची मागणी जोर धरत आहे. नुकतेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50 टक्क्यांनी वाढवून देण्यात आला आहे. डीए 50 टक्क्यांनी वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अन्य भत्त्यांतही वाढ झालेली आहे. असे असताना आता वेतन, अन्य भत्त्यांच्या वाढीची शिफारस करणाऱ्या आठव्या वेतन आयोगीच लवकरात लवकर स्थापना करावी, अशी मागणी केली जात आहे.

इकोनॉमिक्स टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार जॉइन्ट कन्सल्टिव्ह मशिनरी फॉर सेन्ट्रल गव्हर्नमेंट एम्पलॉईजच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिन शिव गोपाल मिश्रा यांनी भारत सरकारच्या क्रबिनेट सचिवांना एक पत्र लिहिले आहे. लवकरात लवकर आठव्या वेतन आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात 28 फेब्रुवारी 2014 रोजी सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने साधारण दीड वर्षांनंतर आपल्या शिफारसी सरकारला दिल्या होत्या. त्यानंतर 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles