देशभरातील केंद्र सरकारच्या कार्यालयातील सर्व ज्येष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी सकाळी ९.१५ पर्यंत कार्यालयात हजर व्हावे आणि बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावावी, असे आदेश देण्यात आले आहेत. जर निहित वेळेत कर्मचारी कार्यालयात हजर झाले नाहीत, तर त्यांचा हाफ डे लावण्यात येईल, असेही यात म्हटले आहे.
केंद्रीय कर्मचार्यानी रजिस्टरमध्ये हजेरी न लावता केवळ बायोमेट्रिक हजेरी लावावी, असेही बजावले आहे. जर काही कारणांमुळे कर्मचारी कार्यालयात एखाद दिवशी हजर राहू शकले नाहीत. तर त्यांनी वरिष्ठांना त्याबद्दल माहिती देऊन सुट्टीसाठी अर्ज करावा, असेही आदेशात म्हटले आहे. करोना काळानंतर अनेक कर्मचार्यांनी बायोमेट्रिक हजेरी लावणे बंद केले आहे, ही बाब निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत.