राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारकडून शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांची कामे थेट त्यांच्या दारापर्यंत जाऊन केली जात आहे असा दावा करण्यात येत आहे. विविध जिल्ह्यांत स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. हजारो लाभार्थी नशा कार्यक्रमासाठी आणलं जातं आहे. परंतु ही योजना निष्फळ असल्याची भावना काही लाभार्थी सांगत आहेत. आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करीत शासन आपल्या दारी अभियानाची पोलखोल केलीय. या व्हिडिओत लाभार्थी असा बॅच लावलेला वृद्ध व्यक्ती या अभियानावर टिका करताना दिसत आहे.
'शासन आपल्या दारी' उपक्रमाची #पोलखोल pic.twitter.com/EiDcPE9u7g
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 15, 2023