Saturday, October 12, 2024

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत शिपायांचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर -जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा येथील ग्रामपंचायत शिपाई असलेले बापू विश्वनाथ खवळे (वय ४१) हे गावाच्या पाणीपुरवठ्याची मोटार चालू करण्याकरिता गेले असता त्यांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे जामखेड तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर असे की, मयत बापु विश्वनाथ खवळे हे पिंपळगाव आळवा ग्रामपंचायमध्ये शिपाई म्हणुन काम करत होते. काल दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८च्या सुमारास ग्रामपंचायतची पाणी पुरवठा करणारी इलेक्ट्रीक मोटार चालु करण्यासाठी ते घोडेगाव तलावावर गेले होते.

परंतु ते लवकर घरी परत न आल्यामुळे १० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सागर हा वडील घरी आले नाही म्हणुन त्यांना पाहायला घोडेगाव तलावावर गेला होता. त्यावेळी त्याला बापु खवळे यांचे कपडे पाण्याच्या कडेला दिसल्याने त्याने त्याच्या मित्रांना बोलावुन त्यांचा पाण्यामध्ये शोध घेतला असता मयत बापू खवळे हे जिथून गावाला पाणीपुरवठा होतो त्या विहीरीपाशी बेशुध्द अवस्थेत पडले होते. या घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच बाबासाहेब मोहिते, भारत साठे, ज्ञानेश्वर ढवळे, बाळू खवळे, सागर खवळे आदि नागरिकांनी सदर तलावाकडे धाव घेऊन बापू खवळे यांना बाहेर काढले.

यानंतर बापु खवळे यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे उपचाराकरिता घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी ते मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेतील मयत बापू विश्वनाथ खवळे यांचे मेव्हणे भाऊसाहेब पौडमल यांनी दिलेल्या खबरीवरून त्यानुसार खर्डा पोलीस स्टेशनला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles