चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचांसह नऊ सदस्य पदांसाठी निवडणूक पार पडली. यापैकी सरपंच पदासह भाजपचे चार उमेदवार विजयी झाले.राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. ३१ पैकी २२ ग्रामपंचायतींचा निकाल लागला असून तालुक्यातील चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. अशोक गजानन खैरे हे चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवडून आले आहेत.
बारामती तालुका हा पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये नेहमीच राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते. चांदगुडेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपचे उमेदवार निवडून आल्याने सध्या तालुक्यात त्यांच्या विजयाची चर्चा होताना दिसून येत आहे.
चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचांसह नऊ सदस्य पदांसाठी निवडणूक पार पडली. यापैकी सरपंच पदासह भाजपचे चार उमेदवार विजयी झाले.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला जी आश्वासने दिली होती, ती केवळ आश्वासने न राहता ती प्रत्यक्षात विकास कामाच्या माध्यमातून करून दाखवणार असल्याचे चांदगुडेवाडी गावचे नवनिर्वाचित सरपंच अशोक खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास टाकून ५२% मते आम्हाला देऊन विजयी केले आहे त्याबद्दल खैरे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आहे.
अजित पवार गटाकडे २५ पैकी २४ सरपंच
1)भोंडवेवाडी
2)म्हसोबा नगर
3)पवई माळ
4)आंबी बुद्रुक
5)पानसरे वाडी
6)गाडीखेल
7)जराडवाडी
8)करंजे
9)कुतवळवाडी
10)दंडवाडी
11)मगरवाडी
12)निंबोडी
13)साबळेवाडी
14)उंडवडी कप
15)काळखैरेवाडी
16)चौधरवाडी
17)वंजारवाडी
18)करंजे पूल
19)धुमाळवाडी
20)कऱ्हावागज
21)सायबाचीवाडी
22)कोराळे खुर्द
23) चांदगुडेवाडी – सरपंच भाजप
24) शिर्सुफळ
25) मेडद