Friday, December 1, 2023

अहमदनगर जिल्ह्यासह ग्रामपंचायचतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम; आचारसंहिताही लागू

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं आहे. राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल
या ठिकाणी होणार निवडणूकWhatsApp Image 2023 10 03 at 5.38.20 PM

WhatsApp Image 2023 10 03 at 5.38.20 PM0
अनेक जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. तर काही ठिकाणी पोटनिवडणूक प्रस्तावित आहे. त्यामुळे राज्यात दिवाळीआधीच राजकीय फटाके फुटणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: