Saturday, March 2, 2024

स्मशानभूमीच्या कामाच्या बिलाच्या अनुदान मंजुरीसाठी ग्रामसेवकाला २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

स्मशानभूमीच्या कामाच्या बिलाच्या अनुदान मंजुरीसाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्‍वरलगतच्या तळेगाव अंजनेरी येथे हा प्रकार घडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर शांताराम शिंपी (वय ४२) असे संशयित ग्रामसेवकाचे नाव आहे. ‘एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलाला तळेगाव येथील स्मशानभूमीच्या कामासाठी नऊ लाख ९६ हजार ५३८ रुपये ग्रामपंचायतीकडून मिळाले होते. त्यापैकी शासकीय शुल्क कापून सात लाख ४७ हजार सातशे रुपये तक्रारदाराच्या मुलास मिळाले होते. उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून, संबंधित रक्कम अदा करण्यासाठी संशयिताने शुक्रवारी तक्रारदाराकडे २५ हजारांची मागणी केली.
या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्रामपंचायत परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. ‘एसीबी’च्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, अंमलदार प्रफुल्ल माळी, विलास निकम यांनी ही कारवाई केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles