काम बंद काळातील वेतन मिळणार
ग्रामसेवकांच्या न्याय हक्कासाठी व जुन्या पेन्शन योजना लागू होण्यासाठी पुकारलेल्या काम बंद आंदोलन कालावधी मधील चार दिवसाचे विनावेतन पगार देणे बाबतचे आदेश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अशिशजी येरेकर यांनी काढले आहेत.अशी माहिती ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
सरपंच आणि ग्रामसेवकांच्या एकत्रित समस्यावर राज्य ग्रामसेवक युनियन पुकारलेले काम बंद आंदोलन 18 ते 20 डिसेंबर 2023 एकूण 3 दिवस आंदोलन केलेले होते.या आंदोलन कालावधीमधील वेतन कपात करण्यात आलेले होते.अर्जित रजा खर्च घालून ग्रामसेवकांचे वेतन अदा करण्यात यावे.याबद्दल ग्रामसेवक संघटना अहमदनगरने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे वेतन अदा करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.याकरिता माननीय आशिषजी येरेकर,माननीय राहुलजी शेळके साहेब,माननीय दादासाहेब गुंजाळ साहेब यांनी विशेष प्रयत्न केले.त्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाची हार्दिक अभिनंदन ग्रामसेवकांनी तालुका शाखेने चालू महिन्यातील पगाराबरोबर वेतन मिळणे बाबत अर्जित रजेचे फार्म तात्काळ संबंधित विभागात जमा करावेत.असे आवाहन ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे यांनी केले आहे.