जल जीवन मिशन आणि श्रमजीवी संघटनेच्या वादात अडकलेल्या पालघर जिल्ह्यातील तब्बल ४७३ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आजपासून (बुधवार) सामूहिक रजेवर गेले आहेत. यामुळे ग्रामपंचायतचा कारभारावर परिणाम झाला आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांविरोधात श्रमजीवी संघटनेचे जिल्हाभर आंदोलन सुरू आहे. यात ग्रामसेवकांना नाहक भरडला जात असल्याचा आरोप करत ग्रामसेवकांकडून सामूहिक रजेचा इशारा देण्यात आला होता.
जिल्हा परिषदेने याच्यावर कोणताही तोडगा न काढल्याने अखेर आजपासून जिल्ह्यातील 473 ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता ग्रामपंचायत मधील दाखल्यांसाठी काही दिवस खेटे मारावे लागतील.