Sunday, July 21, 2024

ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी मागासवर्गीय महिलांसाठी महत्वाची बातमी….

*ग्रामपंचायत निवणुकीत विजयी मागासवर्गीय महिलांनी निवडणूक राजपत्र जिल्हा वैधता समितीकडे सादर करण्याचे आवाहन*

*अहमदनगर,- डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत मागासवर्गीय प्रवर्गातून दुसऱ्या जिल्ह्यातून निवडून आलेल्या मागासवर्गीय महिला सदस्यांनी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. अशा महिलांनी संबंधित जिल्ह्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नियम ३७ चे राजपत्र प्राप्त करून घेऊन समितीस सादर करावे. असे आवाहन अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव जागेवर निवडणुक लढवून निवडून आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांची यादी उपजिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी, अहमदनगर यांचे कार्यालयाकडून नियम ३७ परिशिष्टानुसार यादी जिल्हा समितीस प्राप्त झालेली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ज्या महिला उमेदवार विवाहानंतर इतर जिल्हयात स्थायिक झालेल्या आहेत व ज्यांनी अहमदनगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज दाखल केलेला आहे व तेथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मागासवर्गीयसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या आहेत. अशा महिलांनी संबंधित निवडणुक अधिकारी यांचेकडून नियम ३७ अन्वये राजपत्र प्राप्त करुन घेऊन समितीस सादर करावे.

राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांना निवडून आल्याच्या दिनांकापासून १ वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे बंधनकारक आहे. तेव्हा याची वेळीच दखल घ्यावी. सदस्याने वेळीच निवडून आल्याचे पत्र (नियम ३७) सादर न केल्यास, निवडणुकीमध्ये निवडून न आल्याचे गृहीत धरुन त्यांचे प्रकरण नियम १७ (२) (३) नूसार निकाली काढण्यात येईल. अर्जदाराचे होणाऱ्या राजकीय नुकसानीस अर्जदार स्वतः जबाबदार राहील याची दखल घ्यावी. असे आवाहन अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles