ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे यांचा शनिवारी सेवानिवृत्ती गौरव सोहळा
अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
नगर: ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा दि. 6 जुलै 2024 रोजी शनिवारी सकाळी 11 ते 4 या वेळेत नगर मध्ये माऊली संकुल साधुसंत,महंत, लोकप्रतिनिधी, अधिकारी,कर्मचारी,आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक,संघटना पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा असतील. ढाकणे यांनी अविरत 38 वर्ष यशस्वी सेवापूर्ती केलेली आहे. गौरव सोहळ्यात त्यांच्या यशस्वी आयुष्याचे विविध पैलू उलगडून दाखवणाऱ्या ‘ग्रामविकासाचा वारकरी’ या विशेष गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे, अशी माहिती माननीय एकनाथराव ढाकणे गौरव समितीच्या वतीने देण्यात आली.
या सोहळ्यात एकनाथ ढाकणे यांच्या संघर्षशील जीवनावरील ध्वनिफित दाखवण्यात येणार आहे. तसेच ग्रामसेवा साहित्य प्रदर्शन, संघटना कामकाजाचे चित्र प्रदर्शन असणार आहे. ढाकणे यांच्यासह ११ सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांचाही सपत्नीक गौरव करण्यात येणार आहे.
याच गौरव सोहळ्यात अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी 4 वाजता होणार आहे. याप्रसंगी 15 टक्के डिव्हीडंट, 10 टक्के ठेवीवर व्याज असे एकूण 1 कोटी 33 लाख रुपये सभासदांच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग करण्यात येणार आहेत.तसेच सभासदांचे गुणवंत पाल्य, विशेष गौरवमूर्तींचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाहन पार्किंगची व्यवस्था सेंट मोनिका अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली आहे.
कार्यक्रमास जिल्ह्यातील तसेच राज्यातील ग्रामसेवकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.