काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा : द रुल’ या आगामी चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं; या गाण्यातील हुक स्टेपची अनेकांना भुरळ पडली. या गाण्यावर लाखो लोक रिल्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज कलाकारांनीही या गाण्यावर रिल्स तयार केल्या आहेत. हे गाणं अजूनही खूप चर्चेत आहे. अशातच आता या चित्रपटातील दुसरं गाणंदेखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं. सूसेकी असं या गाण्याचं नाव असून या गाण्यावरदेखील अनेकजण रिल्स बनवताना दिसत आहेत.
पुष्पा : द रुल’ चित्रपटाच्या पहिल्या भागामधील गाण्यांनीदेखील अनेकांना वेड लावलं होतं. या गाण्यांतील अनेक हुक स्टेप्सदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. दरम्यान, आता ‘पुष्पा : द रुल’ चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘सूसेकी’ गाण्यातील एक हुक स्टेप सध्या खूप व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्येही ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आजीबाई डान्स करताना दिसत आहेत.
Video: पुष्पा 2’ च्या गाण्यावर आजीबाईंचा जबरदस्त डान्स,चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स अन् हटके स्टेप्स..
- Advertisement -