असाच एका लग्नातील वरातीतील आजीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या आजीने जो काही डान्स केला आहे त्याने तरुणांना देखील लाजवलं आहे. सध्या सोशल मीडियावर या आजीचीच्या डान्सची जोरदार चर्चा होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका रस्त्यावरुन लग्नाची वरात जात आहे. याच वरातीत अनेक महिला तसेच तरुणही बँडबाजाच्या तालावर डान्स करत आहेत. दरम्यान आजीमध्ये येतात अन् धमाकेदार डान्स करायला लागतात. आजीने निळ्या रंगांची साडी परिधान केलीय. आजी अशी काही नाचली आहेत की तिच्यासोबत नाचणाऱ्या महिलांना सुद्धा असा उत्साह आणता येईना. आजीच्या या डान्सपुढे इतर वऱ्हाडी फिके पडले आहेत.
पोते की शादी की खुशी ऐसा ही होता हैं, दादी जी का डांस 😍👌❤️ pic.twitter.com/TPWe68SGtz
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) January 9, 2024