सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी गोष्टी व्हायरल होतात. यात डान्सचे व्हिडिओ तर सर्वांनाच आवडतात. मजा मस्ती आणि मनासारखं आयुष्य जगायला वयाचं काही बंधन नसतं. सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईंचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजीने केलेल्या कलेसमोर टॉपच्या अभिनेत्रीही फिक्या पडल्यात असं नेटकरी म्हणत आहेत
बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत प्रवेश करण्यासाठी अनेक अभिनेत्री सुरुवातीला मॉडलिंग करतात. त्यानंतर त्यांना चित्रपटांची ऑफर मिळते. आजवर तुम्ही अनेक अभिनेत्रींना मॉडलिंग करताना पाहिलं असेल. मात्र तुम्ही एखाद्या आजीबाईंना मॉडलिंग करताना पाहिलं आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका आजीने चक्क कॅटवॉक केला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका गावात खेळ पैठणीचा कार्यक्रम सुरू आहे. या खेळात अनेक महिला सहभागी झाल्यात. पैठणी मिळवण्यासाठी महिलांनी अनेक खेळांत भाग घेतला आहे. नवविवाहीत महिलांसह येथे अनेक वृद्ध महिला देखील पैठणी मिळवण्यासाठी खेळ खेळत आहेत.
Video: 70 वर्षांच्या आजीसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडल्या जबरदस्त….
- Advertisement -