गाणं गायला कुणाला आवडत नाही? फार मोठे सिंगर नसले तरी बेकार बेसुर माणसंही कामात किंवा प्रवास करताना गाणं गुणगुणत असतात. प्रत्येकाचा वेगळा काळ असतो आणि आपल्या काळानुसार प्रत्येकाच्या आवडीची गाणीही वेगळी असतात. सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल झालाय. आजींनी आपल्या अनोख्या अंदाजात एक कोळी गाणं गायलंय
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजी शेतात काम करत आहेत. शेतीच्या कामात काहीसा विरंगुळा म्हणून तुम्ही पूर्वीच्या बायकांना ओव्या गाताना पाहिलं असेल. अशात या आजींनी ओवी नाही तर थेट एक रोमँटीक गाणं गायलंय. पोरी येडा केलास, मला पागल केलास तुझ्या नादाने… हे गाणं गायलंय.
आगदी ताल सुर लावत आजींनी हे गाणं गायलंय. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. आजींनी गायलेल्या गाण्यामुळे शेतात काम करणाऱ्या इतर महिलांना देखील आनंद होतो. आजींचं गाण ऐकूण एक तरुण तेथे येतो. तो आजींना मोठ्या आवाजात गाणं गायला सांगतो. त्यानंतर आजी जो काही सुर लावतात त्याने व्हिडीओ पुढे पहातच रहावासा वाटतो.
Video: पोरी येडा केलास मला पागल केलास… शेतात आजीनं गायलं भन्नाट गाणं
- Advertisement -