Saturday, January 25, 2025

भारतीय रेल्वेकडून शिर्डी, शनिशिंगणापूरला भेट देण्याची उत्तम संधी! हॉटेल, जेवण, प्रवास सर्व काही बजेटमध्ये

सध्या डिसेंबरचा महिना सुरू आहे. हा सुट्ट्यांचा महिना समजला जातो. अशात तुम्हाला जर कुटुंबासोबत देवदर्शन करायचे असेल तर भारतीय रेल्वे तुम्हाला खास संधी देतेय. ते म्हणतात ना, देवाचं बोलावणं आलं की माणूस त्याच्यापर्यंत जाऊन पोहचतोच.. आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेच्या कमी खर्चातील अशा पॅकेजबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही शिर्डी, शनिशिंगणापूरला जाऊ शकता, देवदर्शन करू शकता. IRCTC च्या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला हॉटेल, जेवण, प्रवास सर्वकाही बजेटमध्ये मिळणार आहे.

भारतीय रेल्वेच्या IRCTC टूर पॅकेजमध्ये, प्रवास योजना आगाऊ तयार केली जाते. म्हणूनच, तुम्हाला कोणत्या मंदिरांना भेट देण्याची संधी मिळेल हे आधीच माहित असते. टूर पॅकेजेसमुळे कुटुंबासह प्रवास करणे परवडणारे बनते कारण त्यात प्रवास, भोजन आणि निवास यांचा समावेश होतो. पॅकेज प्रवास देखील सुरक्षित आहे, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि मुले असलेल्या कुटुंबांसाठी. जर तुम्ही हे पॅकेजच्या माध्यमातून दर्शनासाठी गेलात तर तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूला हॉटेल शोधण्याची गरज नाही. अनेक टूर पॅकेजेसमध्ये मंदिरांचा इतिहास, पौराणिक कथा आणि चालीरीतींची माहिती देणारे अनुभवी मार्गदर्शक असतात. टूर पॅकेजमधील सुविधा वाचूनच बुक करा. हॉटेल बुकिंग, प्रवास आणि पॅकेजमधील जेवण IRCTC द्वारे मॅनेज केले जाते. आजत आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध मंदिरांची सविस्तर माहिती देणार आहोत.

शनी शिंगणापूर आणि शिर्डी टूर पॅकेज
हे पॅकेज 10 डिसेंबरपासून सुरू झाले आहे.
पॅकेज 2 रात्री आणि 3 दिवसांसाठी आहे.
रेल्वेने प्रवास करण्याची संधी मिळेल.
पॅकेज फी – 2 लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 9440 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 8650 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 7180 रुपये आहे.
लक्षात ठेवा की IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून तिकीट बुक करा.

नाशिक आणि शिर्डी टूर पॅकेज
हे पॅकेज 13 डिसेंबरपासून सुरू झाले आहे.
पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांसाठी आहे.
रेल्वेने प्रवास करण्याची संधी मिळेल.
पॅकेज फी – 2 लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 7970 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 7780 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 7350 रुपये आहे.
भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.

पॅकेजमध्ये उपलब्ध वैशिष्ट्ये
दोन्ही पॅकेजेस स्टँडर्डसाठी स्लीपर क्लासमध्ये आणि आरामासाठी 3AC मध्ये ट्रेनने प्रवास करण्याची संधी देतात.
प्रवासासाठी एसी वाहन उपलब्ध असेल.
ब्रेकफास्ट उपलब्ध असेल, परंतु लंच आणि डिनरची सुविधा पॅकेज फीमध्ये समाविष्ट नाही.
प्रवासाच्या कार्यक्रमानुसार, तुम्हाला सर्व प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल.
हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles