नगर – मालवण येथील नोंदलं दिनानिमित्त राजकोट येथे आठ महिन्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृर्ती पुतळा मुळसधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे या कामाच्या निकृष्ट दर्जाचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले, मात्र पुन्हा अशी घटना घडली, तर याबाबत कुठली ही पुर्वसुचना न देता मोठ्या स्वरुपाचे आंदोलन ठाकरे गट शिवसेनेच्यावतीने करण्यात येईल, अशा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिला आहे.
मालवन येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या निषेधार्थ नगर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे दुग्ध व जलाभिषेक करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सहसचिव विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, परेश लोखंडे, संतोष गेनप्पा, संदिप दातरंगे, गौरव ढोणे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी महापौर भगवान फुलसैंदर व युवासेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांनी या घटनेचा निषेध करुन उच्च दर्जाचे शिवस्मारक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.