शहर शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
नगर -हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे राज्याच्या राजकारणात इतका दिर्घकाळ एखाद्या राजकीय पक्षाचे नेतृत्व अन्य कुठल्याही राजकीय नेत्याने केले नाही हे सत्य आहे. आपल्या निर्भिड, बेधडक व सडेतोडपणा हे त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे तसेच प्रेमळ व तितकाच मायेचा आधार देणार्या स्वभावामुळे शिवसैनिक त्यांना आपले दैवत मानत. त्यांचा शद्ब म्हणजे शब्द असत. त्यामुळे त्यांनी अनेक वर्ष मराठी जनतेच्या हृदयावर राज्य केले. त्यामुळेच लोकांनीच त्यांना हिंदूहृदयसम्राट ही पदवी दिली, असा नेता पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
शहर शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने नेता सुभाष चौक येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, संग्राम कोतकर, परेश लोखंडे, अरुणा गोयल, लता पठारे, मनिषा पठारे, प्रा.अंबादास शिंदे, संदिप दातरंगे, अरुण झेंडे, जेम्स आल्हाट, प्रताप गडाख, राज गोरे, हेमंत आजगे, उमेश काळे, रमेश खेडकर, अक्षय नागापुरे, दिपक भोसले, डॉ.श्रीकांत चेमटे, अण्णा घोलप आदि उपस्थित होते.
यावेळी विक्रम राठोड म्हणाले, शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांचे तत्व शिवसैनिक राबवतात. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचेच काम पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. बाळासाहेबांनी अनेकांना उभे करण्याचे काम केले. मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच आज शिवसैनिक ताठ मानेने उभा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही, सर्वसामान्यांना न्याय मिळावा. यासाठी आपले आयुष्य वेचले असा महान व्यक्ती जनमाणसाच्या मनात स्मृती कायम राहतील, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.