Monday, July 22, 2024

Video: ‘गुलाबी साडी’ गाण्यावर भरलग्नात नवरदेवाच्या मित्रांनी केला डान्स

सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात; ज्यात अनेकदा नवऱ्याचे मित्र हटके गिफ्ट देताना दिसतात, तर कधी लग्न सुरू असताना विचित्र विनोद करताना दिसतात. मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तर नवरदेवाचे मित्र नवऱ्यासोबत मंडपात ल्युडो खेळताना दिसले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. दरम्यान, आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या मित्रांचा डान्स तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये लग्न सुरू असलेल्या ठिकाणी अनेक पाहुणे उपस्थित आहेत. यावेळी अचानक नवरदेवाच्या मित्रांची एंट्री होते. हे मित्र काळ्या रंगाचे कपडे घालून डोक्यावर गुलाबी ओढणी घेऊन येतात, तेवढ्यात गुलाबी साडी हे गाणं लागत आणि ते मित्र त्या गाण्यावर सुंदर डान्स करतात. या सगळ्यांचा डान्स पाहून लग्नात उपस्थित असलेली मंडळी त्यांच्याकडे कौतुकाने पाहतात व त्यांचा व्हिडीओ काढतात, तसेच काही लोक त्यांच्याकडे पाहून हसतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles