लग्न म्हणजे फक्त दोन मनंच नाही तर दोन कुटुंबंदेखील जोडली जातात. लग्नाच्या वयात येताच तरुण-तरुणी आपल्या लग्नाचे स्वप्न पाहतात. आपला जोडीदार कसा असावा अशा विविध कल्पना करतात. पण, हल्ली लग्नासाठी अनेक तरुण-तरुणींना आपल्या मनासारखा जोडीदारच मिळत नाही, त्यामुळे लग्न खूप उशिरा होतात. पण, याच परिस्थितीला कंटाळलेल्या एका तरुणाने असं काहीतरी केलंय जे पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल.
सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे अनेक व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो. ज्यात लग्नाचे अनेक मजेशीर किस्से, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक कधीही न पाहिलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नमंडपातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक नवरदेव लग्नासाठी मंडपात बसला असून तो लग्न विधीसाठी बसलेला दिसत आहे. पण, यावेळी त्याच्या बाजूला वधू नसून वधूच्या वेशात चक्क बाहुली बसलेली दिसत आहे. यावेळी तो नवरदेव चक्क बाहुलीबरोबर लग्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लास्ट ऑप्शन असे लिहिलेले आहे.
https://x.com/Memessking/status/1823274184740315393?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1823274184740315393%7Ctwgr%5Ebf5e6c700e88b063bda036ecc6264992b63c16be%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fviral-video-the-groom-is-marrying-with-doll-video-goes-viral-on-social-media-sap-20-4537278%2F