लग्न म्हटल्यावर घरात खूप जास्त आनंदाचे वातावरण असते. सगळीकडे धम्माल, मज्जा, मस्ती सुरू असते. मात्र, मज्जा मस्तीसोबतच लग्नाची तयारी करताना सर्वांचीच गडबड होते. अनेकदा बऱ्याच गोष्टी विसरतात. तर कधी मूहूर्तावर विधी होत नाही. त्यामुळे खूप गोंधळ उडतो. असाच एका लग्नातील मूहूर्त गाठण्यासाठी गोंधळ झालेल्या कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.लग्नात मूहूर्तावर सर्व विधी होणे खूप गरजेचे असतात. मूहूर्तावर लग्न होण्यासाठी खूप प्रयत्न करतात. असाच एका नवरदेवाने लग्नाचा मूहूर्त टळू नये यासाठी चक्क मेट्रोने प्रवास केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत एका कुटुंबाची मूहूर्त टळू नये यासाठी होणारी धडपड दिसत आहे. मूहूर्तावर नवरदेव विवाहस्थळी पोहचावा यासाठी संपूर्ण कुटुंबियांनी मेट्रोने प्रवास केला आहे. नऊवारी साड्या, दागिने असा मराठमोळा लूक करुन नवऱ्याच्या नातेवाईकांनी मेट्रोने प्रवास केला आहे. तर नवरदेवाने धोतर, कुर्ता, उपरणं आणि डोक्यावर मुंडावळ्या बांधून मेट्रोने प्रवास केला आहे.