चेन्नई : तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथील एका बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढे जीएसटीच्या तक्रारींचा पाढा वाचल्यामुळे श्री अन्नपूर्णा रेस्टॉरंटचे मालक श्रीनिवासन यांना अर्थमंत्र्यांपुढे माफी मागावी लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कृतीबद्दल माफी मागितली आहे.
प्रत्येक वस्तूवर वेगळा जीएसटी आकारल्यामुळे नागरिकांना त्रास होतो. या गोंधळामुळे संगणकावर काम करताना समस्या येत आहे, अशी तक्रार श्रीनिवासन यांनी केली होती. यावर विचार करू असे सीतारामन यांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना माफी मागावी लागली.
https://x.com/Marathi_Rash/status/1834522156711006578
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत म्हटले की, अन्नपूर्णा रेस्टॉरंटसारख्या छोट्या व्यावसायिकांनी जीएसटी व्यवस्था सुलभ करण्याची मागणी केली होती,परंतु त्यांच्या विनंतीला अहंकार आणि उघडउघड अनादर दाखवला गेला.