Tuesday, May 28, 2024

निवडणुकीच्या कामासाठी आता १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांचीही नियुक्ती

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी, तसेच मतदारांना मार्गदर्शन करणे, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवर सहकार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये एनएसएस, एनसीसी, स्काऊट, आरएसपी आणि इतर इच्छुक विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.

निवडणुकीच्या कामासाठी विविध सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. आता मतदान केंद्रावर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना मदत करण्यासांठी १८ वर्षांखालील म्हणजेच एनएसएस, एनसीसी, स्काऊट, आरएसपी आणि इतर इच्छुक विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षक निरीक्षक कार्यालयाने मुंबईतील सर्व मान्यताप्राप्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच मतदारांना मदत करण्यासाठी इयत्ता नववी ते १२ वीमधील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची नावे व संबधित विषयाचे शिक्षक यांची नावे सादर करण्याचे आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयाने दिले आहेत.

मुंबईसह राज्यात एप्रिल-मे महिन्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. उष्माघातामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळावे, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles