Saturday, May 25, 2024

नगर जिल्ह्यातील ‘महाराष्ट्र केसरी’ वंचित कडून दिंडोरी लोकसभेच्या मैदानात

दिंडोरीत वंचितकडून ‘महाराष्ट्र केसरी’ मैदानात

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र केसरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील मल्ल गुलाब बर्डे यांना रिंगणात उतरवले आहे. यानिमित्ताने वंचित आघाडीने दुर्लक्षित भिल्ल समाजाला प्रथमच उमेदवारी देत न्याय दिल्याची भावना बर्डे यांनी व्यक्त केली. दिंडोरी या आदिवासी राखीव मतदारसंघात भिल्ल समाजाच्या मतदारांची मोठी संख्या आहे. मागील निवडणुकीत वंचितला ५८ हजार ८४७ (५.२ टक्के) मते मिळाली होती. कृषिबहुल दिंडोरीच्या जागेवर महायुतीने भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाविकास आघाडीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे या शिक्षकाला उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने बर्डे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles