नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गुलाबी साडी या मराठमोळ्या गाण्याने समाजमाध्यमांवर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. आता या व्हायरल व्हिडीओमध्ये समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेला ‘डान्सिंग डॅड’ ऊर्फ रिकी पाँड याने या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिकी पाँड गुलाबी साडी या गाण्यावर जबरदस्त डान्स करीत आहे. यावेळी ते गाण्यातील प्रत्येक स्टेप अगदी हुबेहूब करीत आहेत. त्याशिवाय त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावदेखील खूप सुंदर आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ricky.pond या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.