आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचा वापर करून तयार केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका ‘गुलाबी शरारा’ या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. सहसा फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घाबरत असतात. हे विद्यार्थी मात्र, आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत आहेत.