अनेकदा काही लग्नांमध्ये वर पक्ष आणि वधू पक्षामध्ये भांडणे झालेली पाहायला मिळतात. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे काहीतरी पाहायला मिळतेय की, जे पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.
लग्नात अनेकदा वर-वधू एन्ट्रीला डान्स करताना दिसतात; तर कधी नवरदेव त्यांच्या मित्रांसोबत लग्नमंडपाबाहेर डान्स करताना दिसतो. असे दृश्य बऱ्याच लग्नांमध्ये आपण पाहत आलो आहोत. अनेकदा लग्नातील डान्समुळे आणि इतर गमतीजमतींमुळे लग्न लावणारे गुरुजी खूप चिडतात. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्न लावणारे गुरुजीच चक्क नाचताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरलग्नमंडपात लग्न पार पडल्यानंतर लग्न लावणारे गुरुजी वधू-वराच्या समोर येतात आणि त्यांना नाचण्यासाठी आग्रह करतात. यावेळी ते स्वतःदेखील नाचायला सुरुवात करतात. गुरुजींना नाचताना पाहून वधूदेखील काही स्टेप्स करते. त्यानंतर वधू-वर एकमेकांचा हात पकडून लाजत लाजत काही स्टेप्स करतात. त्यांच्यासमोर गुरुजी मात्र खूप सुंदर डान्स करताना दिसत आहेत.