एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अशी अनेक जोडपी असतात ज्यांना घरातून नात्यासाठी परवानगी नसते. अशावेळी जगाची पर्वा न करता ही जोडपी गुपचूप एकमेकांना भेटतात. मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही” मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं या प्रेमात पडलेल्या तरुणाईचं असतं. घरच्यांचा डोळा चुकवून ते एकमेकांना भेटतात खरे पण कधीतरी ते सापडतातच. असाच एक प्रकार सध्या राजस्थानमधून समोर आला आहे. मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या बॉयफ्रेंडला घरच्यांनी पकडलं अन् नंतर काय झालं ते तुम्हीच पाहा..
राजस्थानमध्ये एका तरुणीनं घरात कुणी नसल्याचा फायदा घेत बॉयफ्रेंडला घरी बोलावलं मात्र तिचा असा पचका झाला की तिला बॉयफ्रेंडला चक्क कुलरमध्ये लपवावं लागलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धरालं
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लपून बसलेल्या या व्यक्तीची पत्नी त्याला शोधत आहे. यावरून तो विवाहित असल्याचं दिसून येतं. त्याचवेळी कुटुंबातील महिला त्या दोघांना शिव्या घालू लागते. नंतर तो कुलरमध्ये लपू बसलेला आढळतो. यावेळी त्याला बाहेर यायला सांगतात. तोही बाहेर येतो आणि यावेळी घरात आरडा ओरडा सुरु होतो.
Kalesh b/w a Guy and girl family over he came to meet her at night and her family caught him inside cooler in Rajasthan pic.twitter.com/bepkikh2Di
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 4, 2023