Friday, June 14, 2024

अहमदनगर पुणे महामार्ग सुप्यातील अतिक्रमणांवर हातोडा….Video

अहमदनगर : सुपा (ता. पारनेर) येथे प्रशासनाने शनिवारी मोठी कारवाई केली. नगर-पुणे महामार्ग, सुपे बसस्थानक, सुपे ते पारनेर रस्ता या भागात वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या अतिक्रमणांवर प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात हातोडा चालविला. त्यामुळे या भागाने आता मोकळा श्वास घेतला आहे. अनेकदा नोटीसा देऊनही अतिक्रमणे काढली जात नव्हती. त्यामुळे प्रशासनाने जेसीबी आणि पोलिस बंदोबस्तात ती हटविली.

सुपे गावातून जाणारा नगर-पुणे महामार्ग, बसस्थानक परिसर, सुपे एमआयडीसी परिसर, सुपे ते पारनेर रस्ता या भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. यातील बरेच लोक परप्रांतीय असल्याचेही सांगण्यात येते. विविध प्रकारच्या अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, विविध आस्थापनांची कार्यालये, कच्ची व पक्की बांधकामे तेथे झाली होती. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा येत होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न निर्माण झाला होता. रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा होत होता. यासंबंधी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी होत्या.

पारनेरच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्यासह पोलीस आणि महसूल विभाग, बांधकाम विभाग कर्मचारी, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळीच मोहीम हाती घेतली. मोहीम सुरू झाल्याचे पाहून काहींनी आपली दुकाने, टपऱ्या स्वत: होऊन काढून घेण्यास सुरूवात केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles