काही दिवसापूर्वी भारतीय संघाने लिजेंड्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर हरभजन सिंग, सुरेश रैना आणि युवराज सिंगसह काही माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर एक रील शेअर केला होता. या रीलमध्ये माजी क्रिकेटपटू ‘तौबा तौबा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला आहे. मात्र आता या प्रकरणात हरभजन सिंगने माफी मागितली आहे.
https://x.com/RichKettle07/status/1812512456469815698
लिजेंड्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तौबा… तौबा या गाण्यावर डान्स करत भारतीय खेळाडू अपंगांसारखे चालत होते. मात्र या व्हिडिओवर भारताची पॅरा बॅडमिंटन खेळाडू मानसी जोशीने टीका केली होती. भारतीय क्रिकेटपटूंनी अपंगत्वाची खिल्ली उडवली होती अशी टीका मानसी जोशीने केली होती. या व्हिडिओवर वाद वाढल्यानंतर तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे आणि आता हरभजन सिंगने या प्रकरणात जाहीर माफी मागितली आहे. हरभजन सिंगने सोशल मीडियावर म्हटले आहे की, आम्ही चॅम्पियनशिप जिंकलो आणि त्यानंतर तौबा… तौबा या गाण्यावर आम्ही रील शेअर केली होती. मात्र या रीलच्या माध्यमातून आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. आम्हाला या रीलमधून फक्त सलग 15 दिवस सलग क्रिकेट खेळल्यावर नेमकं होतं तरी काय हे दाखवायचे होते. हे रील करताना आमच्या मनात कोणाचा अपमान करण्याची इच्छा नव्हती. मात्र तरीही देखील आमच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्य असतील, तर मी त्यांची माफी मागतो. असं हरभजन सिंग म्हणाला.आपल्या कडे सगळाच बेशिस्तपणा झालाय… आरटीओ अधिकाऱ्यांचे चालत्या गाडीत रिल..आ.सत्यजित तांबेंचा संताप..Video