हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसने एक अॅनिमिटेड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चिमटा काढला आहे.
व्हिडीओमध्ये काँग्रेसने नरेंद्र मोदी व अमित शाह यांना मुन्नाभाई व सर्किटच्या (मुन्नाभाई एमबीबीएस व लगे रहो मुन्नाभाई चित्रटातील दोन प्रमुख पात्र) अवतार पाहायला मिळत आहे. मोदी मुन्नाभाई तर शाह सर्किटच्या अवतारात एकमेकांशी बोलत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. यामध्ये मुन्नाभाई सर्किटला म्हणतो, “आपण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश हे राज्य गमावलं आहे. आता हरियाणा देखील आपल्या हातून निसटत चाललं आहे”. यावर सर्किट त्याच्या परीने मुन्नाभाईला वेगवेगळे पर्याय सुचवतो, जे मुन्नाभाई नाकारतो. अखेर तो म्हणतो की “मी मतांचं ध्रुवीकरण कसं करता येईल ते पाहतो, जेणेकरून आपला पक्ष ही निवडणूक जिंकेल”.