प्रसिध्द स्टॅण्ड अप कॉमेडियन हर्ष गुजराल यांचा नगरमध्ये विशेष कार्यक्रम
नगर : देशातील प्रसिध्द स्टॅण्ड अप कॉमेडियन हर्ष गुजराल यांचा विशेष लाईव्ह कार्यक्रम नगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि.3 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9 वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. हर्ष गुजराल प्रथमच नगर शहरात कार्यक्रमासाठी येत आहेत. सोशल मिडियावर त्यांचे प्रचंड संख्येने फॉलोअर्स असून त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची, ऐकण्याची संधी नगरकरांना मिळणार आहे, अशी माहिती आयोजक बॉलस्टर कंपनीचे लोकेश भागचंदानी व किरण भागचंदानी यांनी दिली.
हर्ष गुजराल यांची देशभराती युवा वर्गात मोठी क्रेझ आहे. युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुकवरील त्यांचे व्हिडिओ देश विदेशात पाहिले जातात. त्यांचा स्वत:चा असा चाहता वर्ग असून त्यांच्या नवीन व्हिडिओची सर्वांनाच प्रतिक्षा असते. युवा वर्गाशी त्यांच्याच भाषेत अतिशय हसतखेळत संवाद साधण्यात त्यांचा हातखंडा आहे. उपस्थितांना खिळवून ठेवत ते आपला शो सादर करतात. मूळचे कानपूरचे असलेले हर्ष गुजराल हे देशभरातील विविध शहरात कार्यक्रम सादर करतात. नगरकरांनाही आता त्यांचा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली असून जास्तीत जास्त चाहत्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बॉलस्टर इव्हेंटसने केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 8805039226/ 9270937968.