Tuesday, February 27, 2024

बारामतीची जागा राष्ट्रवादीला हे अजून ठरलेलं नाही, हे महायुतीत अद्याप ठरलं नाही

पुणे : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडेच देण्याचा मोठा निकाल दिला. पण या निर्णयामुळे माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. अजित पवार महायुतीत आले असले तरी इंदापूर विधानसभेची कोणी चिंता करू नये, असं सूचक विधानही हर्षवर्धन पाटलांनी यावेळी केलं.

तुम्ही भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागत होती, पण अजित पवार महायुतीत आल्यानंतर तशीच शांत झोप लागतेय का? असा प्रश्न विचारल्यावर, माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. तसेच बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार घड्याळाचा चिन्हावर उतरेल, हे महायुतीत अद्याप ठरलं नाही, असं म्हणत पाटलांनी अजित पवारांना डिवचले.
अजित पवार महायुतीत आले असले तरीही इंदापूर विधानसभा मतदारसंघाची चिंता कुणीही करू नये असं सूचक वक्तव्य भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी केलं आहे. अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. त्यानंतर महायुतीमध्ये या जागेवर अजित पवार गटाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles