आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतांनाच नगर शहर शिवसेना व युवा सेनेतील खदखद चव्हाट्यावर आली आहे. युवा सेना प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे. युवा सेनेच्या पदाधिकार्यांना विचारात घेतले जात नसून इतर गटातील फितूर कार्यकर्त्यांना सोबत घेतले जात असल्याचे कोतकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
नगर शहरात ठाकरे गटाची मोठी ताकद असल्याने येथील जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतांनाच नगर शहर युवा सेनेतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेनेच्या पदाधिकार्यांना विचारात घेत नसल्याचा आरोप कोतकरांकडून केला जात आहे. तसेच स्वपक्षातील पदाधिकार्यांना विचारात न घेता दुसर्या गटातील फितूर कार्यकर्त्यांना मोठेपणा दिला जात आहे. त्यामुळे आमदारकीचे स्वप्न पाहणार्यांनी पक्षाचे नुकसान करु नये असा टोलाही नगर शहर युवा सेना प्रमुख कोतकर यांनी लगावला आहे.
आमदारकीचे स्वप्न पाहणार्यांनी पक्षाचे नुकसान करु नये …युवा सेनेचे हर्षवर्धन कोतकर यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा!
- Advertisement -