राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शाहू यांना इशारा देत असताना निवडणूक न लढविण्याची सूचना केली आहे.
कोल्हापूर येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत हसन मुश्रीफ म्हणाले, “छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जेव्हा ठरत होती, तेव्हाच मी त्यांना निवडणुकीत न उतरण्याचे आवाहन केले होते. कोल्हापूरच्या गादीचा एक वेगळा सन्मान आहे. पण राजकारणात उतरल्यानंतर तुम्ही विनाकारण वादात ओढले जाल, असे मी त्यांना सांगितलं होतं. क्रिकेटच्या मैदानात उतरल्यानंतर नियमाप्रमाणे खेळावेच लागतं. मी आजही म्हणेण, अर्ज भरायला अजून वेळ आहे. त्यामुळे तुमचा सन्मान राखायचा असेल तर तुम्ही फेरविचार करावा. कारण ज्या गादीचा आम्ही सन्मान केला, त्यावर टीका होणे आम्हाला योग्य वाटत नाही.”