पाथर्डी-तालुक्यातील आल्हनवाडी येथील प्राथमिक आश्रमशाळेतील सुरज पांढऱे व पायल पांढरे या बहीणभावाच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी शनिवारी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यी, शिक्षकांशी सवांद साधला. चौकशी करुन घटनेला प्रथमदर्शनी जबाबदार असणारे प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब मस्के व वसतिगृह अधीक्षक ज्ञानदेव कर्डिले यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तर संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.
शुक्रवारी (दि.27) अल्हनवाडी आश्रमशाळेत सूरज संदीप पांढरे ( 8) व पायल संदीप पांढरे (9) यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी शनिवारी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यी, शिक्षकांशी सवांद साधला. दरम्यान चौकशीत एका विद्यार्थ्याने सुरज व पायलला शेततळ्याकडे जाताना पाहीले होते. त्याने त्यांना जाऊ नका अशी विनवणी केली होती. त्याची माहीती तेथील लोकांना दिली. तरीही ही घटना घडली आहे असे समोर आले आहे.
घटनेच्या हलगर्जीपणाबाबत प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब मस्के व वसतिगृह अधीक्षक ज्ञानदेव कर्डिले यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांना दोषी ठरवत सेवेतुन निलंबीत करण्यात आले आहे.