Tuesday, February 27, 2024

धक्कादायक….सहलीवेळी मुख्याध्यापिकेचा विद्यार्थ्याबरोबर खुले आम रोमान्स फोटो शूट

एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यावर शाळा प्रशासनाने तिच्यावर कारवाई केली आहे. व्हायरल फोटोंमध्ये ही शिक्षिका विद्यार्थ्यासोबत रोमान्स करताना दिसत आहे. शाळेच्या सहलीच्या वेळीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. हे फोटो पाहून संतापाची लाट उसळली आहे. हे फोटो पाहून गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासल्याची प्रतिक्रिया संतप्त नेटकरी कमेंट करत देत आहेत. हे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यावर मुख्यध्यापिकेचं निलंबन करण्यात आलं आहे.कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुरुगमल्ला गावातील ही आपत्तीजनक घटना समोर आली आहे. मुरुगमल्ला ग्राम सरकारी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका आहे. व्हायरल फोटोमध्ये दिसणारा विद्यार्थी दहावी इयत्तेत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यध्यापिका आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या सहलीच्या वेळी हे रोमँटिक फोटोशूट केल्याचं समोर आलं आहे. यावेळी शाळेतील आणखी एक विद्यार्थ्यीही तिथे उपस्थित असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles