Health…गायीच्या दूधापासून बनविलेले साजूक तुप खाण्याने मिळणारे आश्चर्यकारक फायदे…

0
36

Health..अनेकदा लोक जाडे होऊ या भीतीपायी तुप खाणे टाळतात.परंतु गाईच्या दूधापासून तयार केलेले साजूक तूप आहारात घेतल्यास अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात.

गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापासून रोज साय एकत्रित करून त्याचे दही, दहयापासून लोणी व लोण्यापासून तयार केलेले तूप हेच साजूक तूप.दूध काढण्यापासून ते तूप होईतोपर्यंत पाच अग्निसंस्कार कार्यरत असतात. परिणामी,सेवन केल्यानंतर जाठराग्नी सह धात्वाग्नीला प्रदीप्त करून धातूंमध्ये सहज रूपांतरित होते.यामुळे शरीराचे बल वाढल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
सर्व तुपांमध्ये गायीचे तूप सर्वश्रेष्ठ असते. शरीरस्थ सप्तधातूंची वाढ होऊन मेंदू शांत राहतो. उष्णता दूर होते व रक्ताची शुद्धी होते. नियमितपणे तुपाचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक असते. शक्यतो रोजच भोजनाची सुरुवात गरम वरण-भात व साजूक तुपाने करावी.यामुळे अन्न सहज पचते. आहाररस सारवान होतो. व त्यामुळे गुणवान रसधातूमुळे त्वचा स्निग्ध, निर्मल,सुकुमार व सतेज राहते, तारूण्य दिर्घकाळ टिकते व सौंदर्यात भर पडते.
सकाळ-संध्याकाळ तुपाचा दिवा लावल्याने सूक्ष्मजंतूंचा नाश होतो. म्हणूनच यज्ञामध्ये याचा वापर केला जातो.साजूक तूप सारवान मज्जाधातू उत्पन्न करतो, यामुळे बुद्धी, धारणाशक्ती व स्मरणशक्‍ती वाढते.
गाईचे तूप डोळ्यांसाठी हितकारक, मैथुनशक्ती वाढविणारे, अग्निप्रदीपक,वात, पित्त, कफनाशक,लावण्य,कांती, सामर्थ्य व तेज वाढवणारे,बलदायक,पवित्र,आयुष्यवर्धक व रसायन आहे.म्हशीचे तूप मधुर,शितल,कफकारक,रक्त पित्तनाशक,जड,पित्त,रक्तदोष व वायूनाशक आहे.बकरीचे तूप खोकला,श्वास,क्षयामध्ये गुणकारी असते. (सामान्य माहितीसाठी)