Thursday, May 22, 2025

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात लागोपाठ दुसर्‍या दिवशी दमदार पाऊस

अहमदनगर-नगर शहरासह जिल्ह्यात लागोपाठ दुसर्‍या दिवशीच्या रात्री मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेष करून कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यासह नगर, शेवगाव, संगमनेर तालुक्यातील काही मंडळात दोन दिवसांपासून वादळी वार्‍यासह पाऊस बरसत आहे. रविवारी दिवसभर आणि शनिवारी पाथर्डी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. या पावसामुळे पाथर्डी तालुक्यातील पाण्याचे टँकर बंद होण्याची शक्यता आहे. नगर शहरात दुपारी चारपासून दमदार पावसाला सुरूवात झाली असून रात्री उशीरापर्यंत हा पाऊस सुरू होता.

जिल्ह्यात 7 व 8 जूनला मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. असह्य उष्णतेने अस्वस्थ झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास सुरूवात झाली आहे. दुसरीकडे खरीपच्या पेरण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली असून कपाशी लागवडीसाठी शेत तयार करण्यात शेतकरी व्यस्त दिसत आहे. दक्षिण जिल्ह्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र अधिक असून झालेल्या पावसामुळे कडधान्य पिकांच्या पेरणीला सुरूवात होणार आहे. कृषी विभागाच्यावतीने पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांना सुरूवात न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात अनेक महसूल मंडळात मोठ्या पावसाची प्रतिक्षा असल्याने पुढील काही दिवसात पाऊस झाल्यानंतर सर्वदूर पेरण्यांना सुरूवात होणार आहे.
रविवारी दुपारनंतर नगर शहरासह जिल्ह्याच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी वादळीवार्‍यासह ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरूवात झाली होती. रात्री उशीरापर्यंत हा पाऊस सुरू होता. पुढील काही दिवस हा पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. नगर शहरात रविवारी रात्री उशीरापर्यंत हा पाऊस सुरू होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles