भारतीय हवामान खात्याने आजपासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलंय
परतीचा प्रवास सुरु होण्याआधी महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. येत्या 24 तासांत मराठवाडा, खान्देशमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पुणे नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यात हलका ते मध्यम पाऊस होईल, असं आयएमडीने सांगितलं आहे.
आयएमडीने पुढील २४ तासांसाठी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी विदर्भातील काही जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.